Kolhapur मध्ये Home Loan साठी A to Z Process (Complete Guide Marathi 2026)
गृह कर्ज (Home Loan) घेताना अनेक लोकांना process नीट माहित नसते, त्यामुळे confusion निर्माण होतो. या ब्लॉगमध्ये आपण Home Loan घेताना कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, हे सोप्या मराठीत समजून घेऊ.
![]() |
| Kolhapur मध्ये Home Loan Process कशी असते? A to Z Guide (Marathi 2026) |
🏡 Home Loan घेताना महत्वाच्या गोष्टी
Home Loan approve होण्यासाठी बॅंक काही महत्वाच्या गोष्टी तपासते. त्या खालीलप्रमाणे:
📋 1. KYC Documents (ओळख व पत्त्याचा पुरावा)
कर्जदार व सह-कर्जदार यांचे खालील कागदपत्रे आवश्यक असतात:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- लाईट बील
- मतदान ओळखपत्र
- रेशन कार्ड
👉 वरील कागदपत्रांपैकी काही कागदपत्रे बॅंक ओळख व पत्त्याचा पुरावा म्हणून मागू शकते.
💳 2. CIBIL Score चे महत्व
बॅंक तुमचा CIBIL Score तपासते, ज्यावरून तुमची कर्ज परतफेड करण्याची सवय कळते.
👉 बॅंक खालील गोष्टी तपासते:
- तुम्ही याआधी कर्ज घेतले आहे का
- कर्जाची परतफेड वेळेवर केली का
- किती कर्ज घेतले आहे
📊 CIBIL Score Range:
- 750+ → खूप चांगला (Loan सहज मिळतो)
- 700+ → चांगला
- 650 खाली → Loan मिळणे कठीण, व्याजदर जास्त लागू शकतो
💰 3. Income Proof (उत्पन्नाचा पुरावा)
तुम्हाला किती Home Loan मिळेल हे तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असते.
👨💼 जर तुम्ही नोकरदार असाल:
- Salary Slip (3 ते 6 महिने)
- Form 16
- Appointment / Offer Letter
- Bank Statement (6 महिने ते 1 वर्ष)
👨💻 जर तुम्ही व्यावसायिक असाल:
- व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र
- कच्ची-पक्की बिले
- मागील 3 वर्षांचे ITR
- Bank Statement (6 महिने ते 1 वर्ष)
🏠 4. Property Documents (मालमत्तेची कागदपत्रे)
तुम्ही खरेदी किंवा बांधकाम करणार असलेल्या घराचे खालील कागदपत्रे आवश्यक असतात:
- 7/12 उतारा
- Property Card
- Layout
- बांधकाम परवाना
- घराचा Plan व Estimate
- जुने खरेदीपत्र (असल्यास)
⚖️ 5. Legal & Technical Verification
बॅंक तुमची Property verify करण्यासाठी:
📑 Legal Check:
- मागील 13 वर्षांचे व्यवहार तपासले जातात
- Property कायदेशीरदृष्ट्या clear आहे का हे पाहिले जाते
🏗️ Technical Check:
- Property चे सरकारी व बाजार मूल्य
- Road access
- बांधकाम स्थिती
📄 6. Loan Sanction (कर्ज मंजुरी)
वरील सर्व तपासणीनंतर:
- तुमचे उत्पन्न
- Property चे valuation
याच्या आधारे बॅंक तुम्हाला किती कर्ज देता येईल हे ठरवते आणि Sanction Letter देते.
💸 7. Disbursement (कर्ज वितरण)
जर तुम्ही कर्जाच्या अटी मान्य केल्या तर:
- Loan Agreement वर सही घेतली जाते
- Property वर तारण (Mortgage) नोंदवले जाते
- कर्जाची रक्कम तुमच्या किंवा विक्रेत्याच्या खात्यात जमा केली जाते
👉 जर तुम्ही घर बांधकाम करत असाल, तर:
कर्जाची रक्कम टप्प्याटप्प्याने (Stages मध्ये) दिली जाते.
📞 निष्कर्ष (Conclusion)
Home Loan process अवघड नाही, पण योग्य माहिती आणि मार्गदर्शन असणे खूप महत्वाचे आहे.
Kolhapur मध्ये Home Loan साठी योग्य मार्गदर्शन हवे असल्यास:
Swapnapurti Consultancy कडून तुम्हाला मिळेल:
✔ पूर्ण A to Z guidance
✔ योग्य bank selection
✔ fast loan process
✔ परवडणाऱ्या शुल्कात सेवा
तुमचं घर, आमची जबाबदारी – Swapnapurti Consultancy
Property व Loan विषयी अशाच माहिती साठी आम्हाला Fecebook, Instagram व YouTube वरती Follow करा.

0 Comments
Swapnapurti Consultancy मध्ये
Property खरेदी-विक्री व Loan साठी योग्य व सुरक्षित मार्गदर्शन दिले जाते.
कृपया संपूर्ण माहिती घेऊनच व्यवहार करा.
आपली चौकशी येथे लिहा. 🙏